वाशीम - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात परिस्थिती गंभीर झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वच स्तरातून मदतीचा ओघ सुरू आहे. या काळात वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थांनच्यावतीने 300 गोरगरीब गरजू लोकांना रोज अन्नदान केले जात आहे. तसेत यावेळी संस्थानने पंतप्रधान फंडाच्या मदतीकरीता 21 लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे सुपूर्द केला.
गुरुमंदीर संस्थानकडून 300 गरीबांची भागवली जातेय भूक, 21 लाखांची मदतही - lockdown in washim
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गोरगरीबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थांनच्यावतीने 300 गोरगरीब गरजू लोकांना रोज अन्नदान केले जात आहे. तसेत यावेळी संस्थानने पंतप्रधान फंडाच्या मदतीकरीता 21 लाख रुपयांचा धनादेश तहसीलदार धीरज मांजरे यांच्याकडे सुपूर्द केला.
वाशीम जिल्ह्यातील दत्तावतार स्वामी नृसिंह सरस्वती यांचे जन्मस्थान म्हणून प्रख्यात असलेल्या कारंजा लाड येथील नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संस्थांनच्या गरिबांची भूक भागवली जात आहे. देशात लॉकडाऊन असल्याने गोर गरिबांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला आहे. दररोज 300 गोरगरीब गरजू लोकांना अन्नदान केले जात आहे.
कोरोनामुळे देशावर मोठे संकट ओढवले आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची गरज असून, कोरोनाचा फैलाव वाढू नाही यासाठी देशभरात आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासन स्तरावरून सुरू आहेत. लॉकडाऊन घोषीत केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळत आहे. कारंजा येथील गुरुमंदिर संस्थानचे विश्वस्त मंडळ मदतीसाठी पुढे आले आहे. संस्थानच्या वतीने 21 लाखाचा रुपयांचा धनादेश तहसीलदार धीरज मांजरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आला आहे.