वाशिम- जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पोलिसांनी देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त केली आहेत. शहरातील व्हिडीओ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंगरुळपीर येथे देशी कट्टा जप्त; तीन आरोपींना अटक
जिल्ह्यात मंगरुळपीर येथे पोलिसांनी देशी कट्ट्यासह जिवंत काडतुस जप्त केली आहेत. शहरातील व्हिडीओ चौकात पोलिसांनी ही कारवाई केली. यामध्ये तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मंगरुळपीर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली. शहरतील व्हिडीओ चौकात तिघेजण संशयितरित्या पोलिसांना आढळून आले. त्यांची चौकशी केली असता, त्यांच्याकडून एक देशी कट्टा व एक जिवंत काडतुस किंमत 70 हजार तसेच एक मोटारसायकल (एम एच ३७ वाय ४३४६) किंमत ४० हजार रुपये असा एकूण १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेत आरोपी आशिष गजानन इंगोले (वय २७) रा. मोहरी, केतन केशव इंगोले (वय २३) रा. मोहरी, आकाश भीमराव वाघमारे (वय २१) रा. रहीत या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एक आरोपी परवेज अन्सारी रा. नालासोपारा हा फरार असल्याचे समजते.
ही कारवाई ठाणेदार विनोद दिघोरे यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे, हवालदार अंबादास राठोड, हवालदार सुनील गंडाईत, उमेश ठाकरे, संदिप खडसे यांनी केली. आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले आहे. न्यायालयाने आरोपींना ९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.