महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी आवश्यक - पालकमंत्री शंभूराज देसाई - वाशीम कोरोना अपडेट

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे. याकरता जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

Guardian Minister Shambhuraje Desai said that strict implementation of Corona preventive measures is necessary
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी आवश्यक - पालकमंत्री शंभूराज देसाई

By

Published : May 6, 2021, 10:55 PM IST

वाशिम - जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गेल्या काही दिवसांपासून स्थिर आहे. रुग्णवाढीचा आलेख खाली आणण्यासाठी कोरोना संसर्गाची साखळी तोडणे आवश्यक आहे. याकरता जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, ६ मे रोजी दूरदर्शी प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत दिल्या.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी आवश्यक - पालकमंत्री शंभूराज देसाई

पालकमंत्री देसाई म्हणाले, कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. ई-पास शिवाय कोणालाही जिल्ह्यात प्रवेश देवू नये. अत्यावश्यक आणि महत्वाचे कारण असेल तरच जिल्ह्याबाहेर प्रवासासाठी ई-पास उपलब्ध करून द्यावा. शहरी व ग्रामीण भागामध्ये परवानगी दिलेली आस्थापना, दुकानांच्या ठिकाणी कोरोना सुरक्षा नियमांचे पालन होईल, कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील उपाययोजनांवर सुद्धा विशेष लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या.

जिल्ह्यात सुरु असलेल्या नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला गती द्यावी. हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित झाल्यास जिल्ह्याची ऑक्सिजनची गरज भागविण्यासाठी मोठी मदत होणार आहे. त्यामुळे या कामांना प्राधान्य देवून संबंधित एजन्सीकडे सातत्याने पाठपुरावा करावा. जिल्हा वार्षिक योजनेतून कार्यारंभ आदेश दिलेले ऑक्सिजन कॉन्संट्रेटर, बायपॅप मशीन लवकरात लवकर उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या. वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालयातील कोविड रूग्णालयामध्ये ७५ ऑक्सिजन बेड व कारंजा उपजिल्हा रुग्णालयात ५० ऑक्सिजन वाढविण्याच्या कार्यवाहीचाही पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला. वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होणे, वृक्ष कोसळणे यासारखे प्रकार घडल्यास तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी यावेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीची कार्यवाही, संचारबंदी अंमलबजावणी आदी बाबींचा आढावा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details