वाशिम -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज १२९वी जयंती आहे. दरवर्षी देशात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा सोहळा साजरा होतो. मात्र, यावर्षी देशभरात लॉकडाऊन असल्याने जयंती सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन गृह राज्यमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती घरीच साजरी करा; पालकमंत्री शंभूराज देसाईंचे आवाहन
दरवर्षी देशात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा सोहळा साजरा होतो. मात्र, यावर्षी देशभरात लॉकडाऊन असल्याने जयंती सोहळा घरीच साजरा करण्याचे आवाहन गृह राज्यमंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी घरात राहणे, हाच एकमेव उपाय आहे. सध्याची परिस्थिती बघता राज्य शासनाने ३० एप्रिल २०२० पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आंबेडकर जयंतीनिमित्त सार्वजनिक स्वरूपाचे कार्यक्रम आयोजित न करता घरीच जयंती साजरी करावी. घरामध्ये त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करावे, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी केले.