महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Washim : एसटीचा संप मिटेपर्यंत ग्रामपंचायतीच्या खर्चातून एसटी कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह - सरपंचानी घेतली जबाबदारी

एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत. आधीच तुटपुंज्या पगारावर काम करीत असलेले हे कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांचे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले आहे.

Washim
Washim

By

Published : Nov 30, 2021, 2:47 PM IST

वाशिम : गेल्या पंचवीस दिवसांपासून राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत . संप मिटतच नसल्यामुळे संपावर असलेल्या कुटुंबाची अवस्था वाईट झाली आहे. त्यामुळे संप मिटेपर्यंत गावातील एसटी कार्यरत कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील कारखेडा गावच्या सरपंच सोनाली बबनराव सोळंके यांनी उचलली आहे.

ग्रामपंचायतीच्या खर्चातून एसटी कर्मचाऱ्याचा उदरनिर्वाह
एस.टी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून संपावर आहेत. आधीच तुटपुंज्या पगारावर काम करीत असलेले हे कर्मचारी संपावर असल्यामुळे त्यांचे कुटुंब मोठ्या अडचणीत सापडले आहे. कुटुंबाचा गाडा ओढताना कमालीचा त्रास होत आहे . कारखेडा येथील गोपाल रामदास तुपोने हे कारंजा आगारात वाहक पदावर कार्यरत आहेत .

सरपंचानी घेतली जबाबदारी
आर्थिक विवंचनेत असलेल्या युवकाची आणखी ओढताण होऊ नये म्हणून गावच्या सरपंच सोनाली सोळंके यांनी एसटीचा संप मिटत नाही , तो पर्यंत त्यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. गोपाल तुपोने याला घरपोच किराणा दिला आहे.
हेही वाचा -Omicron Variant : महापौर किशोरी पेडणेकरांनी विमानतळाची पाहणी करून घेतला आढावा

ABOUT THE AUTHOR

...view details