महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या....शेतकरी पुत्राची राज्यपालांकडे मागणी

अवकाळी पावसामुळे वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील सोयाबीन व तूर पिकांची प्रचंड हानी झाली आहे. महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामेही केले. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. बँकांकडून कर्ज फेडण्यासाठी नोटीस येत आहे. या परिस्थितीमुळे मालेगाव तालुक्यातील ग्राम तिवळी येथील शेतकरीपुत्राने सहपरिवार आत्महत्या करण्याबाबत राज्यपालांना पत्र पाठविले आहे.

निवेदन देताना शेतकरी पुत्र रवी लहाने

By

Published : Nov 16, 2019, 9:26 AM IST

वाशिम- अवकाळी पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, तूर या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना अद्याप शासकीय मदत किंवा विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई मिळाली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या बिकट परिस्थितीत आता जगणेही कठीण झाल्याने सहपरिवार आत्महत्या करण्याची परवानगी द्या, अशी मागणी मालेगाव तालुक्यातील ग्राम तिवळी येथील शेतकरीपुत्र रखी वामन लहाने याने राज्यपालांकडे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

माहिती देताना शेतकरी पुत्र रवी लहाने

अवकाळी पावसामुळे वडिलांच्या नावे असलेल्या शेतातील सोयाबीन व तूर पिकाची प्रचंड हानी झाली. महसूल व कृषी विभागाने नुकसानाचे पंचनामेही केले. मात्र, अद्यापपर्यंत कुठलीच शासकीय मदत मिळाली नाही. बँकांकडून कर्ज फेडण्यासाठी नोटीस येत आहे. या गंभीर परिस्थितीमुळे जगणे असह्य झाल्याने तत्काळ शासकीय मदत करण्यात यावी किंवा आमच्या संपूर्ण परिवारास आत्महत्या करण्याची परवानगी तरी द्यावी, अशी मागणी रवी लहाने या शेतकरी पुत्राने राज्यपालांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा-बोरमधील पर्यटकांची गर्दी मंदावल्याने, जिप्सीलाही ब्रेक; स्पर्धेतून रोजगार वाढणार?

ABOUT THE AUTHOR

...view details