वाशिम- शासनाने रिसोड तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाकडून सोयाबीनसह इतर पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना दुष्काळी मदतही मिळाली आहे. मात्र, या दुष्काळी मदतीतून शासनाने हळद पीक वगळल्याने शेतकरी नाराज झाला आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात शेतकरी आणि शिवसंग्रामच्या वतीने आज रिसोड मेहकर रोडवरील लोणी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
हळदीला हेक्टरी एक लाख दुष्काळी मदत द्या, अन्यथा आंदोलन करू; रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा - रिसोड मेहकर रोड
तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे पिक घेतले जाते. मात्र, याच पिकाला दुष्काळी मदतीतून वगळल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात शेतकरी आणि शिवसंग्रामच्या वतीने आज रिसोड मेहकर रोडवरील लोणी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात हळदीचे पिक घेतले जाते. मात्र, याच पिकाला दुष्काळी मदतीतून वगळल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले आहे. शासनाने हेक्टरी एक लाख रुपये मदत मिळावी यासाठी हळद उत्पादक शेतकरी आणि शिवसंग्रामच्या वतीने आज रिसोड मेहकर रोडवरील लोणी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. तब्बल दोन तास चाललेल्या या रास्तारोको आंदोलनामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शासनाकडून हळदीला मदत मिळाली नाही, तर यापुढे संपूर्ण तालुक्यात चक्काजाम करू, असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.