महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्वच्छतागृहातला व्हिडिओ व्हायरल; १८ वर्षीय मुलीची आत्महत्या - मंगरुळपीरमधील जिल्हा परिषद हायस्कुलची बातमी

मंगरुळपीर येथील जिल्हा परिषद शाळेत एका 18 वर्षीय मुलीला तिच्या आरोपी मित्राने स्वच्छतागृहात बोलावले. दरम्यान आणखी एकाने त्या दोघांचे व्हिडिओ चित्रण केले.

washim police station
वाशिम पोलीस ठाणे

By

Published : Dec 6, 2019, 10:13 PM IST

वाशिम - येथील मंगरूळपीरमधील जिल्हा परिषद शाळेच्या स्वच्छतागृहामध्ये एकाने मुलीचे मोबाईल चित्रीकरण केले. ते सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे बदनामीच्या भीतीने मुलीने विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या केलेल्या मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर मंगरूळपीर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा-#HyderabadEncounter: 'त्या' चौघांचा कर्दनकाळ ठरलेला 'एन्काऊंटर मॅन' आहे तरी कोण..

मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेतील एका 18 वर्षीय मुलीला आरोपी मित्राने स्वच्छतागृहात बोलावले. दरम्यान आणखी एकाने त्या दोघांचे व्हिडिओ चित्रण केले. ते सोशल मीडियावर पसरवले. त्यामुळे समाजात बदनामी होईल या भीतीने त्या मुलीने आत्महत्या केली. घटनेची तक्रार मुलीच्या वडिलांनी मंगरूळपीर पोलीस ठाण्यात नोंदविताच पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. सायबर सेलच्या मदतीने चौकशी करून किती लोकांना हा व्हिडिओ पाठवला याची तपासणी पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details