महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंगावर भिंत पडून २ वर्षीय चिमुकलीचा करूण अंत; दोन जण जखमी - धार पिंप्री

घराचा दरवाजा लावण्याकरीता दरवाजा ओढला असता अचानकपणे दरवाज्यासमोरची भिंत अंगावर येऊन कोसळली. यामध्ये तिन्ही मायलेक जखमी झाले. यात २ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

मृत वृषाली योगेश डाखोरे

By

Published : Mar 15, 2019, 12:10 PM IST

वाशिम -जिल्ह्यातील धार पिंप्री येथील घराची भिंत अंगावर पडून २ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर तिची आई व भाऊ जखमी झाले आहेत. वृषाली योगेश डाखोरे (वय २) असे मृत मुलीचे नाव आहे.

मालेगाव तालुक्यातील धार पिंप्री येथील योगेश डाखोरे, त्यांची पत्नी दिपाली या आपला मुलगा कृष्णा (वय ४ वर्ष) व मुलगी वृषाली (वय २ वर्ष) यांना सोबत घेऊन माहेरी राजुरा येथे जाण्याकरिता निघाली होत्या. यावेळी घराचा दरवाजा लावण्याकरीता दरवाजा ओढला असता अचानकपणे दरवाज्यासमोरची भिंत अंगावर येऊन कोसळली. यामध्ये तिन्ही मायलेक जखमी झाले. यात २ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाल्याने तिला तत्काळ मालेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तर मुलगा कृष्णा व त्याची आई दिपाली हे जखमी झाले. या घटनेमुळे धारपिप्री गावावर शोककळा पसरली असून दोन वर्षे चिमुकलीच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details