वाशिम - मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी लाठी शेतशिवारातील विहिरीत पडलेल्या घोणस जातीच्या दोन सापांना जीवनदान दिले आहे.
लाठी शिवारात विहिरीत पडलेल्या २ घोणस सापांना जीवनदान
वाशिम जिल्ह्यातील लाठी शेतशिवारात असलेल्या रामचंद्र सुर्वे यांच्या विहिरीत दोन घोणस जातीचे साप पडले होते.
हेही वाचा -डॉ. श्रीराम लागूंनी पाहिलेली 'ही' ठरली शेवटची नाटकं, कलाकारांना दिली होती कौतुकाची थाप
वाशिम जिल्ह्यातील लाठी शेतशिवारात असलेल्या रामचंद्र सुर्वे यांच्या विहिरीत दोन घोणस जातीचे साप पडले होते. त्यानंतर मंगरुळपीर तालुक्यातील वनोजा येथील सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचून फांदीच्या मदतीने दोन्ही सापांना विहिरीच्या बाहेर काढले. त्यानंतर या विषारी घोणस जातीच्या सापांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिले आहे.