महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

संत गजानन महाराजांच्या पालखीचे वाशिम जिल्ह्यात जल्लोषात स्वागत.. - 4 दिवस मुक्काम

संतनगरी शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यात 4 दिवस मुक्काम राहणार असून यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत गजानन महाराजांच्या पालखी बद्दल माहिती देतांना नागरिक

By

Published : Jun 16, 2019, 11:51 PM IST

वाशीम- संतनगरी शेगाव येथून मार्गस्थ झालेल्या संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्ह्यात मोठ्या जल्लोशात स्वागत करण्यात आले आहे. संत गजानन महाराजांच्या पालखीचा जिल्ह्यात 4 दिवस मुक्काम राहणार असून यानिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

संत गजानन महाराजांच्या पालखी बद्दल माहिती देतांना नागरिक


तब्बल ७०० वारकऱ्यांसह टाळ मृदंगाच्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या पालखीसोबत घोड्यांचाही समावेश आहे. मालेगाव येथील दुपारच्या विसाव्यानंतर पालखीचा मुक्काम शिरपूर येथे झाला.


महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या पालखीने आषाढीवारीकरीता पंढरपूरकडे प्रस्थान केले असून तब्बल 52 दिवसांच्या पायी प्रवासानंतर पालखी पंढरपुरात दाखल होते. प्रत्यक्ष गजानन महाराज या दिंडीत वारकऱ्या सोबत पायी चालतात अशी भावना भाविकांची असल्याने हजारो भाविक श्रद्धेने या दिंडीत सहभागी होतात.


पावसासाठी विठुरायाला प्रार्थना करणार वारकरी-


हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा पाऊस समाधान कारक सांगितला मात्र 15 दिवस लोटले तरी पाऊस झाला नसल्याने यावर्षी तरी मान्सूनचा पाऊस चांगला व्हावा आणी वरुण राजाने सर्वत्र हजेरी लाऊन रान ओलेचिंब करावे यासाठी शेतकरी बांधवांनी गजानन महाराज पालखीत सहभागी होऊन विठुरायाला प्रार्थना केली आहे.


मागील ५२ वर्षाची परंपरा असलेल्या या दिंडी सोहळ्यात सहभाग घेणाऱ्या वारकऱ्यांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे. वारी दरम्यान संस्थानकडून ठेवण्यात येणारी चोख व्यवस्था तसेच गजानन महाराजांवर असलेली अपार श्रद्धा यामागील कारण असल्याचे वारकरी सांगत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details