वाशिम- जिल्ह्यातील मांडवा फाट्याजवळील वळणावर शनिवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात कोसळली. यात एका गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने खड्ड्यात उलटली चारचाकी, गर्भवती महिलेसह 4 जण गंभीर जखमी - वाशिम अपघात बातमी
वाशिम जिल्ह्यातील मांडवा फाट्याजवळील वळणावर शनिवारी (दि. 20) सायंकाळी साडेसहा वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी रस्त्याच्या कडेला एका खड्ड्यात कोसळली. यात एका गर्भवती महिलेसह चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अपघातग्रस्त कार
या अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्याले. त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा केला.
हे ही वाचा -Terrible Accident Video: पिकअपचा टायर फुटून भीषण अपघात; एक ठार, चार जखमी,