महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी पिण्यासाठी नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - वाशिम बैल मृत्यू न्यूज

नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना मानोरा तालुक्यातील वरोली येथे घडली. जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

oxen
बैल

By

Published : Mar 8, 2021, 12:27 PM IST

वाशिम - अरुणावती नदीत पाणी पिण्यासाठी गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. मानोरा तालुक्यातील वरोली येथे ही घटना घडली. मोटारपंप पाण्यात असल्याने उघड्या तारेमुळे पाण्यात विद्युत प्रवाह उतरलेला होता.

नदीत पात्रात गेलेल्या चार बैलांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
दादाराव गावंडे यांचे तीन तर श्रीराम गावंडे यांचा एक बैल ठार झाला असून यामध्ये त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. शेतात पाणी नसल्याने या शेतकऱ्यांना आपल्या जनावरांना पाणी पाजण्यासाठी नदीवर पाठवावे लागते. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details