वाशिम -कारंजामध्ये पोलिसांनी 4 किलो गांजा जप्त केला असून, या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. सलीम खान असद खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
आरोपीकडे गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचला. आरोपी दुचाकीवर दारव्ह्याकडून कारंजाकडे येत असताना पोलिसांनी त्याला वाटेत अडवले व त्याची झडती घेतली. या झडतीत पोलिसांना त्याच्याकडे चार किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई कारंजा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गर्दशनाखाली शहर पोलिसांच्या पथकाने केली.