महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर वन मंत्री संजय राठोड यांच्या वाशिम दौऱ्यावर शिक्कामोर्तब - वाशिम जिल्हा बातमी

आज (मंगळवार) वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पूजा चव्हाण प्रकरणाबाबत ते माध्यमांसमोर काहीतरी बोलतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

संजय राठोड
संजय राठोड

By

Published : Feb 23, 2021, 2:59 AM IST

वाशिम - पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर नॉटरिचेबल असलेले वन मंत्री संजय राठोड आज (दि. 23 फेब्रुवारी) वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे दर्शनासाठी येत असल्याचा त्यांच्या अधिकृत दौऱ्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

बोलताना प्रतिनिधी
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले वन मंत्री संजय राठोड हे त्या प्रकरणापासून अद्यापपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, ते आज (मंगळवार) वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सकाळी साडेअकराच्या सुमारास श्री क्षेत्र पोहरादेवी येथे आगमन व भेट असा त्यांचा अधिकृत दौरा असल्याची माहिती वाशिम जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.

वन मंत्री संजय राठोड पोहरादेवी दर्शनानंतर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर माध्यमांसमोर काय बोलतील हे संजय राठोड पोहरादेवी येथे आल्यानंतरच कळेल.

हेही वाचा -पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : पोहरादेवीला आल्यावर मंत्री संजय राठोड काही बोलण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details