महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शासनाने दिलेले निर्देशाचे पालन करा- किर्तनकार कमलपाल‌‌‌ रमेशराव गाठे - CORONA WASHIM NEWS

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. मात्र, नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देशाचे पालन करायला हवे, या महामारीच्या संकटावर विजय मिळवायला हवा, असे संदेश हिवरा लाहे येथील किर्तनकार कमलपाल‌‌‌ रमेशराव गाठे दिला आहे.

follow-the-instructions-given-by-the-government-says-ramesh-gathe
शासनाने दिलेले निर्देशाचे पालन करा

By

Published : Apr 3, 2020, 11:33 AM IST

वाशिम-जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात लाॅकडाऊन लागू असून संचारबंदीही आहे. नागरिकांनी घरातच बसावे, काळजी घ्यावी, असे प्रशासन वारंवार आवाहन करत आहे. मात्र, काही नागरिक घराबाहेर येत आहेत. मात्र, नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देशाचे पालन करायला हवे, या महामारीच्या संकटावर विजय मिळवायला हवा, असे संदेश हिवरा लाहे येथील किर्तनकार कमलपाल‌‌‌ रमेशराव गाठे दिला आहे.

हेही वाचा-अमेरिकेत कोरोनाग्रस्तांचा आ़कडा 2 लाखांच्या पुढे; 5 हजार मृत्यू

दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.

या रविवारी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता. मला तुमचे नऊ मिनिट हवे आहेत. घरातल्या सगळ्या लाईट बंद करुन मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅश लाईट लावून दरवाजात किंवा बाल्कनीत उभे रहा असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले आहे. कोरोना संकटाशी लढण्यासाठीचा मोदींचा हा नवा उपक्रम आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details