वाशिम - जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पावर दरवर्षी अनेक दुर्मिळ पक्षांसह फ्लेमिंगो प्रजातीच्या विदेशी पक्षांचे आगमन होते. मात्र, यावर्षी फ्लेमिंगोंचे अद्याप आगमन झालेले नाही. त्यातच सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत असल्याने इतर पक्षी बघण्यासाठी एकबुर्जी प्रकल्पावर येणारी पर्यटकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
वाशिममधील एकबुर्जी प्रकल्पावर यावर्षी फ्लेमिंगोंचे आगमन नाही - एकबुर्जी प्रकल्प
वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पावर यावर्षी फ्लेमिंगोंचे अद्याप आगमन झालेले नाही. त्यातच सर्वत्र कोरोना विषाणूची दहशत असल्याने इतर पक्षी बघण्यासाठी एकबुर्जी प्रकल्पावर येणारी पर्यटकांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.
फ्लेमिंगो
हेही वाचा -कोरोना : निर्यात ठप्प झाल्याने दररोज १५ हजार क्विंटल केळी पडून
विदर्भात केवळ वाशिम जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पावर विदेशी पक्षी आढळतात. वर्षातील काही महिने या पक्षांचे एकबुर्जी येथे वास्तव्य असते. हे पक्षी बघण्यासाठी पर्यटक गर्दी करत असतात.