मालेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह 5 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण - corona
विशेष म्हणजे यातील तिघांनी कोरोना लसीकरणचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला होता.
वाशीम : वाशीम जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाशीम जिल्ह्यातील मालेगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांसह पाच कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे यातील तिघांनी कोरोना लसीकरणचा पहिला आणि दुसरा डोस घेतलेला होता.
सध्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी केली जात आहे. मात्र कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोना संदर्भातील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईच्या वेळेस कुणीतरी संपर्कात आल्याने या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचीही चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होताना दिसत आहे.