वाशिम -कोरोना विषाणूने सध्या संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. देशात आणि राज्यातदेखील कोरोनाबाधितांची संख्या सुमारे अडीच हजारांच्या पुढे गेली आहे. असे असताना वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण दिल्ली येथील 'तबलिगी जमात मरकझ' या कार्यक्रमाला गेला असल्याची माहिती मिळत आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. सोनटक्के यांनी सांगितले.
'कोरोना'चा वाशिममध्ये शिरकाव... आढळला पहिला रुग्ण; 'मरकझ'ला गेल्याची माहिती
वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण दिल्ली येथील 'तबलिगी जमात मरकझ' या कार्यक्रमाला गेला असल्याची माहिती मिळत आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. सोनटक्के यांनी सांगितले.
हेही वाचा...कोरोनाशी कर सुरु लढाई..! जनजागृतीसाठी 'ईटीव्ही भारत'चे खास मराठी गीत
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील 65 वर्षीय व्यक्ती दिल्ली येथून परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी केली असता, त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यात अशा रितीने कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला असल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे आता या रुग्णाच्या संपर्कात किती लोक आले, याची माहिती जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग घेत आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. व्ही. सोनटक्के म्हणाले.