वाशिम -जिल्ह्यातील काटा येथील महादेव निंबलवार आणि गोदावरी घंटे या दोघांच्या शेतातील गोठ्याला आग लागल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. यामध्ये शेती उपयोगी साहित्य जळून झाले खाक झाले. आगीमुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याने दोन गोठे जळून खाक; लाखोंचे नुकसान - वाशिम बातमी
वाशिम जिल्ह्यात आज दोन ठिकाणी गोठ्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या. यामध्ये शेती उपयोगी साहित्य जळून झाले खाक झाले आहे. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याने दोन गोठे जळून खाक; लाखोंचे नुकसान
शेजारी असलेल्या शेतकऱ्यांनी गोठ्यातील जनावरे बाहेर काढल्याने सुदैवाने त्यांना वाचविण्यात यश आले. दरम्यान, आग कशामुळे लागली याचे कारण कळू शकले नाही. मात्र माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी हानी टळली.