वाशिम- कारंजा तालुक्यातील उंबर्डे बाजार येथील भाजीपाला बाजारात मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत एका खानावळीसह हेअर सलूनचे दुकान जळून खाक झाले आहे. यात २ लाखाहून अधिक नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
उंबर्डे बाजारात भीषण आग; २ दुकाने जळून खाक तर लाखोंचे नुकसान
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे.
उंबर्डे बाजारात भीषण आग
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून गावकऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. उंबर्डे बाजार येथील भाजीपाला बाजारात विष्णू तंबाखे यांच्या मालकीची खानावळ आणि गणेश भाकरे यांचे हेअर सलून आहे. या दुकानांला आग लागल्याने दुकानासह संपुर्ण सामान जळून खाक झाले आहे.