वाशिम- महिंद्रा होमलोन या खाजगी कंपनी कडून घेतलेले कर्ज न फेडल्याने किनखेडा येथील सतीश अवचार यांचे घर जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे.
फायनान्स कंपनीकडून शेतकऱ्याच्या घरावर जप्ती;कर्जाचे हफ्ते न फेडल्याने कारवाई - शेतकरी
किनखेडा येथील शेतकरी सतीश अवचार यांनी चार वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी महिंद्रा होमलोन या खासगी कंपनीकडून घेतले होते. पण ते कर्ज न फेडल्याने त्यांचे घर जप्त करण्यात आले आहे.
रिसोड तालुक्यातील किनखेडा येथील शेतकरी सतीश अवचार यांनी चार वर्षांपूर्वी घर बांधण्यासाठी महिंद्रा फायनान्स कंपनी कडून दीड लाख रुपयांचे गृह कर्ज घेतले होते. त्यापैकी त्यांनी ८३ हजार रुपये फेडले. मात्र २ लाख ६७ हजार रुपये फेडायचे बाकी होते. त्यामुळे दिलेल्या अवधीत ते फेडू न शकल्यामुळे कंपनीने ही कारवाई केली. यामुळे अवचार यांचा संसार उघड्यावर आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून रिसोड तालुका दुष्काळग्रस्त असल्याने शासनाने कर्ज वसुली बंद केली आहे. मात्र, महिंद्रा फायनान्स ने घर जप्त केल्यामुळं त्यांच्यासमोर नवीनच संकट उभे राहिले आहे.