महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कारंज्यात किसनलाल नथमल महाविद्यालयातील विद्यार्थांना बाहेरील युवकांकडून बेदम मारहाण, ६ गंभीर

बुधवारी अचानक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह काही युवकांच्या जमावाने हाती पडेल ते साहित्य घेऊन महाविद्यालयात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना लोखंडी रॉड, काठ्या, विटा, दगड आदी साहित्याने जबर मारहाण केली

मारहाण झालेले विद्यार्थी

By

Published : Feb 14, 2019, 1:42 PM IST

वाशिम- जिल्ह्यातील कारंजा येथील स्थानिक के. एन. महाविद्यालयात विद्यार्थी आणि बाहेरील काही युवकांमध्ये वाद निर्माण झाला होता. हे प्रकरण शांत झाल्यानंतर बुधवारी पुन्हा उग्र झाले. बाहेरील काही युवकांनी महाविद्यालयात घुसून ६ विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. तसेच महाविद्यालयातील साहित्याचीही तोडफोड केली आहे.

किसनलाल नथमल महाविद्यालय परिसर आणि मारहाण झालेले विद्यार्थी
कारंजा येथील कि.न. महाविद्यालयात काही बाहेरील युवक व विद्यार्थ्यांत वाद झाला होता. हा वाद प्राध्यापकांच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. मात्र, बुधवारी अचानक हा वाद पेटला आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसह काही युवकांच्या जमावाने हाती पडेल ते साहित्य घेऊन महाविद्यालयात प्रवेश केला. त्यानंतर विद्यार्थ्यांना लोखंडी रॉड, काठ्या, विटा, दगड आदी साहित्याने जबर मारहाण केली.

या मारहाणीत सहा विद्यार्थी गंभीर जखमी झाले. घटनेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जखमी विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details