महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कार अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू; सहा जण गंभीर जखमी - वाशिम लेटेस्ट कार अपघात बातमी

वाशिममध्ये लग्नाचा बस्ता करून घरी जाणाऱ्या कारचा अपघात झाला. भरधाव कंटेनरने कारला समोरून धडक दिल्याने हा अपघात झाला. दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, सहाजण जखमी झाले आहेत.

Accident
वाशिम अपघात

By

Published : Mar 29, 2021, 8:51 AM IST

वाशिम - लग्नाचा बस्ता घेऊन घरी जाताना झालेल्या अपघातात नवरीचे काका आणि चुलत बहिणीचा जागीच मृत्यू झाला. नागपूर-औरंगाबाद महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील पिंप्री सरहद येथे शनिवारी रात्री ही घटना घडली.

नवरीसह इतर पाचजण जखमी -

बुलढाणा जिल्ह्यातील शेंदुर्जनाचे रहिवासी दिनकर एकनाथ शिंगणे हे त्यांच्या पुतणीच्या लग्नाच्या खरेदीसाठी अमरावतीला गेले होते. अमरावती येथून घरी परत जात असताना शनिवारी रात्री वाशिममध्ये त्यांच्या कारला मेहकर कडून येणाऱ्या भरधाव कंटेनरने समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात दिनकर एकनाथ शिंगणे (वय 44) व कल्याणी दिनकर शिंगणे (वय 18) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नवरी शिवकन्या अशोक शिंगणे हिच्यासह तिचे वडील अशोक एकनाथ शिंगणे, नंदकिशोर शिंगणे, ज्ञानेश्वर शिंगणे, धनंजय शिंगणे आणि कार चालक योगेश बबन ईधारे हे जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांनी जखमींना जवळच्या डोणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. शिरपूरचे पोलीस निरीक्षक सुनील वानखेडे यांच्यासह पोलीस जमादार राजु वानखेडे, गणेश कोकाटे व इतर सहकाऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन अपघाताचा पंचनामा केला.

ABOUT THE AUTHOR

...view details