वाशिम - देशात कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळं खरीप हंगामासाठी लागणाऱ्या रासायनिक खते-बियाणे खरदेसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ नये, म्हणून कृषी विभागाकडून अॅप तयार करण्यात आले आहे. कर्मचारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करीत आहेत.
खरीप हंगामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी अॅपवर नोंदणी करा, कृषी विभागाचे आवाहन - corona
खरीप हंगामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी कृषी विभागाने एक अॅप तयार केले आहे. त्या अॅपवरून नोंदणी केल्यास लागणारे सर्व साहित्य शेतीच्या बांधावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

खरीप हंगामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी अॅपवर नोंदणी करा, कृषी विभागाचे आवाहन
खरीप हंगामासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी अॅपवर नोंदणी करा, कृषी विभागाचे आवाहन
या अॅपला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आजपर्यंत 12 हजार 470 शेतकऱ्यांनी 2 हजार 75 क्विंटल बियाणे तर 2 हजार 244 टन खतासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. विशेष म्हणजे आपल्या पसंतीच्या कृषी सेवा केंद्रावर आपली नोंदणी करता येत आहे. त्यानुसार निविष्ठा शेतकऱ्यांना घरपोच देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कृषि सेवा केंद्रामध्ये कुठेही गर्दी न होता शेतकऱ्यांना घरपोच निविष्ठा मिळत आहेत.
Last Updated : May 18, 2020, 12:42 PM IST