वाशिम- जिल्ह्यात यंदा खरीप पीक कर्जाचे वाटप संथगतीने सुरू आहे. पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकऱ्यांपैकी २० जुलैपर्यंत केवळ ७२हजार ६११ शेतकऱ्यांनाच पीककर्जाचा लाभ मिळालाय. त्यामुळे ४२ हजार ५६७ शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
पीक कर्ज वाटपाची गती वाढत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली... - पीक कर्जाविना शेतकरी संकटात
वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वितरणाची गती संथच सुरू आहे. पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकऱ्यांपैकी २० जुलैपर्यंत केवळ ७२ हजार ६११ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून अद्यापही ४२ हजार ५६७ शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेतच आहेत.
कोरोना संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीने शेतकरी अडचणीत आला आहे. पीककर्ज वाटप गतीने होणे आवश्यक असताना अर्धा खरीप हंगाम संपत असून वाशिम जिल्ह्यात पीककर्ज वितरणाची गती संथच सुरू आहे. पात्र असलेल्या १ लाख १५ हजार १७८ शेतकऱ्यांपैकी २० जुलैपर्यंत केवळ ७२ हजार ६११ शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळाला असून अद्यापही ४२ हजार ५६७ शेतकरी पीककर्जाच्या प्रतीक्षेतच आहेत.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना बँकेने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा बँकांवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या होत्या. आता वीस दिवसाचा कालावधी ओलांडला असला तर बँकांकडून पीककर्ज वितरणास दिरंगाई होत असल्याने शेतकऱ्यांमधून रोष व्यक्त होत आहे.