वाशिम - जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. खरीप हंगामातील शोतात उभ्या आणि कापणी झालेल्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामे करून भरपाई मिळावी, यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयावर चकरा मारत आहेत. मात्र कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांचा निराशा होत आहे.
वाशिम : साहेब अर्ज घ्या हो...तालुका कृषि अधिकारी कार्यालयाला कुलूप - कृषि अधिकारी कार्यालयाला कुलूप वाशिम
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या वैयक्तिक पंचनाम्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. शेतकरी पंचनामे करून भरपाई मिळावी यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयावर चकरा मारत आहेत. मात्र कार्यालयाला कुलूप असल्याने त्यांचा निराशा होत आहे.
हेही वाचा -परतीच्या पावसाने वाशिम जिल्ह्याला झोडपले; रिसोडमध्ये घर आणि दुकानात शिरले पाणी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या वैयक्तिक पंचनाम्याची तरतूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान हे वैयक्तिकस्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहे. यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. मालेगाव व कारंजा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी अनुदान मिळावे यासाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयावर पाहोचले. मात्र, ते कार्यालय कुलूपबंद होते. शासनाच्या वतीने पुरवण्यात आलेला टोल फ्री क्रमांक(1800 116 515) सुद्धा लागत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.