वाशिम- जिल्ह्यातील मालेगाव येथील महाबीज कार्यालयात आज (शुक्रवारी) बियाणांचे टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली. यामुळे कोरोनाच्या संकटात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे चित्र दिसून आले.
वाशिममध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा, महाबीज कार्यालयात शेतकऱ्यांची गर्दीच गर्दी
खरीपाच्या पेरणीला सुरूवात झाली असून शेतकरी पेरणीपूर्व मशागती सह बियाणे व खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळेच आज मालेगाव येथील महाबीज कार्यालयात बियाणांचे टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली.
महाबीज कार्यालयाबाहेरील शेतकऱ्यांची गर्दी
खरीपाच्या पेरणीला सुरूवात झाली असून शेतकरी पेरणीपूर्व मशागती सह बियाणे व खतांची जुळवाजुळव करत आहेत. त्यामुळेच आज मालेगाव येथील महाबीज कार्यालयात बियाणांचे टोकन घेण्यासाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी जीवघेणी ठरू शकते. यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीने बियाणे उपलब्ध होईल, याची व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.