महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कर्जबाजारी शेतकऱयाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू - वाशिम बातमी

येवता बंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे (वय ३५)  यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या डोंगर वाढला. त्यामुळे कंटाळून विलास यांनी ३१ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. गावकऱयांनी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तेथुन अमरावती येथील इरवीनमध्ये रवाना केले होते.

कर्जबाजारी शेतकऱयाचा विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान मृत्यू

By

Published : Sep 10, 2019, 3:11 AM IST

वाशिम - येथील कारंजा तालुक्यातील येवताबंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे यांनी नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची घटना सावंगी मेघे येथील रुग्णालयात घडली.

हेही वाचा-वाशिममध्ये महालक्ष्मीच्या सणाचे औचित्य साधून अमरनाथ यात्रेचा देखावा

येवता बंदी येथील अल्पभुधारक शेतकरी विलास बाजीराव कापसे ( वय ३५) यांच्याकडे २ एकर कोरडवाहू शेती आहे. सततच्या नापिकीमुळे कर्जाच्या डोंगर वाढला. त्यामुळे कंटाळुन विलास यांनी ३१ ऑगस्ट रोजी विषारी औषध प्राशन केले. गावकऱयांनी त्यांना कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱयांनी त्यांना तेथुन अमरावती येथील इरवीनमध्ये रवाना केले. मात्र, या ठिकाणी सुध्दा विलास यांच्यावर ईलाज झाला नाही. शेवटी त्यांना सागंवी मेघे येथे दाखल केले, असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मृत विलास यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सुस्वभावी विलास यांच्या आकस्मिक जाण्याने येवता बंदी गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details