महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहा एकरातील कलिंगडावर शेतकऱ्याने फिरविला रोटावेटर, शेतकऱ्याचे 14 लाखांचे नुकसान - लेटेस्ट न्यूज इन वाशिम

संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतातील पीक नष्ट करत आहेत. झाकलवाडी येथील रामकिसन काळबांडे यांनी सहा एकरातील कलिंगडावर ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यामुळे त्यांचे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

Washim
कलिंगडावर रोटावेटर फिरवताना शेतकरी

By

Published : May 29, 2020, 8:40 PM IST

वाशिम- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने संचारबंदी लागू केल्यामुळे जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या. याचा सर्वात जास्त फटका फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. बाजारात ग्राहक मिळत नसल्यामुळे वाशिम जिल्ह्यातील झाकलवाडी येथील रामकिसन काळबांडे यांनी सहा एकरातील कलिंगडावर ट्रॅक्टर फिरविला आहे. त्यामुळे त्यांचे 14 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

कोरोना इफेक्ट; सहा एकरातील कलिंगडावर शेतकऱ्याने फिरविला रोटावेटर शेतकऱ्यांचे 14 लाखाचे नुकसान

रामकिसन काळबांडे यांनी कलिंगड लागवडीसाठी घेतलेले कर्ज फिटणार नसल्याने शेतकऱ्यावर मोठे संकट आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details