वाशिम - कोरोनाच्या संकटाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशिम जिल्ह्यातील ईचा येथील चेतन वानखेडे यांनी दोन एकरावर पत्ता गोबीची लागवड केली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठ न मिळाल्याने हतबल होऊन त्याच्यावर पत्ता गोबीवर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ आली.
बाजारपेठ न मिळाल्याने २ एकरातील पत्ता कोबीवर फिरवला ट्रॅक्टर, अडीच लाखाचे नुकसान
वाशिम जिल्ह्यातील ईचा येथील चेतन वानखेडे यांनी दोन एकरावर पत्ता गोबीची लागवड केली होती. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे बाजारपेठ न मिळाल्याने हतबल होऊन त्याच्यावर पत्ता गोबीवर टॅक्टर फिरविण्याची वेळ आली.
बाजारपेठ न मिळाल्याने २ एकरातील पत्ता कोबीवर फिरवला टॅक्टर
या गोबी लागवडीसाठी 50 हजार रुपये खर्च आला असून, यापासून अडीच उत्पन्न अपेक्षीत होते. मात्र, ग्राहक नसल्याने नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवला आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
Last Updated : Jun 10, 2020, 6:30 PM IST