महाराष्ट्र

maharashtra

धरणात टाकलेली पाईपलाईन काढताना शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू, वाशिम जिल्ह्यातील घटना

By

Published : Jun 6, 2019, 9:24 AM IST

वाशिम जिल्ह्यातील बांबर्डा येथील शेतकरी अनंत रामदास भेंडे हे त्यांच्या शेताला लागून असलेल्या उंद्री धरणात टाकलेली पाईपलाईन काढत होते. दरम्यान, यावेळी ते धरणाच्या खोलभागातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

धरणात टाकलेली पाईपलाईन काढताना शेतकऱ्याचा पाण्यात बुडुन मृत्यू

वाशिम - धरणात टाकलेली पाईपलाईन काढताना धरणाच्या खोलभागातील पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अनंत रामदास भेंडे (४२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

वाशिम जिल्ह्यातील बांबर्डा येथील शेतकरी अनंत रामदास भेंडे हे त्यांच्या शेताला लागून असलेल्या उंद्री धरणात टाकलेली पाईपलाईन काढत होते. यावेळी धरणाच्या खोलभागातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी शोध घेतला. परंतु पाण्याची खोली आणी पाण्याचा परीसर मोठा असल्याने स्थानिकांना शोध कार्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे त्याची माहिती पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला देण्यात आली. त्यानंतर पथक प्रमुख दीपक सदाफळे आपल्या सहकार्‍यांसह आपत्कालीन वाहन घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर एका तासाने मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला.

यावेळी घटनास्थळी महसूलचे उपविभागीय अधिकारी अनुप खांडे आणि नायब तहसीलदार विनोद हरणे, पोलीस विभागाचे पी. एस. आय. मानकर व पी. एस. आय. जगदाळे उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details