महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे बैलजोड्यांचे भव्य प्रदर्शन - वाशिम बैल प्रदर्शन

वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे श्री मुंडेश्वर बैल पोळा समितीच्यावतीने बैल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात वाशिम जिल्ह्यातील 100 ते 200 बैलांच्या जोड्यांनी सहभाग नोंदवला.

वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे श्री मुंडेश्वर बैल पोळा समितीच्यावतीने बैल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले

By

Published : Sep 1, 2019, 8:01 PM IST

वाशिम -शेतात अहोरात्र काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आणि बैलांना रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा, या उद्देशाने बैल प्रदर्शन भरवण्यात आले. वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे श्री मुंडेश्वर बैल पोळा समितीच्यावतीने हे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

वाशिम जिल्ह्यातील रिठद येथे श्री मुंडेश्वर बैल पोळा समितीच्यावतीने बैल प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले


या प्रदर्शनात वाशिम जिल्ह्यातील 100 ते 200 बैलांच्या जोड्यांनी सहभाग नोंदवला. शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना सजवून प्रदर्शनात आणले होते. उत्कृष्ट बैल जोडीसाठी 11 हजार रुपये तर उत्कृष्ट बैल जोडी सजावटीसाठी 7 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले होते.

हेही वाचा -गावकऱ्यांचं अर्थकारण बदलून टाकणारा बाप्पा...


उत्कृष्ट बैल जोडीचे प्रथम पारितोषिक (11 हजार रुपये) रिसोड येथील शेतकरी महादेव शेळके यांच्या बैलजोडीला मिळाला. तर उत्कृष्ट बैलजोडी सजावटीचे 7 हजार रुपये रिठद येथील अशोक रामचंद्र बोरकर यांच्या बैल जोडीला मिळाले.

ABOUT THE AUTHOR

...view details