वाशिम -वाशिम मधील खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून जास्तीची रक्कम वसूल केल्याचा आरोप केला जात आहे. येथे उपचार घेणाऱ्या अनेक रुग्णांना रक्कम परत केली आहे. मात्र शिरपूर आणि वाघी येथील रुग्णांना रक्कम परत मिळाली नसल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. 31 मार्च पूर्वी आम्हाला रक्कम परत मिळाली नाही. तर मातोश्री समोर आत्मदहनाची परवानगी रुग्णांनी मुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे.
31 मार्चला आत्मदाहणाचा इशारा-
वाशिम जिल्ह्यात ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने, जिल्हा प्रशासनाने एका खासगी रुग्णालयात 100 खाटाची परवानगी दिली होती. मात्र या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णाकडून अधिकचे रक्कम वसूल केल्याचा तक्रारी आल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी एक समिती नेमून काही रुग्णांना पैसे परत केले आहेत. मात्र शिरपूर येथील बालाजी कदम तर वाघी येथील भीमराव कव्हर याना रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे रक्कम परत मिळाली नाही तर मातोश्री समोर 31 मार्चला आत्मदाहनाचा इशारा या रुग्णांनी दिला आहे.