महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट: वाशिममध्ये छुप्या मार्गाने प्रवेश होणाऱ्या प्रकाराची प्रशासनाकडून दखल

वाशिम जिल्हा प्रवेश बंद असताना येवती येथे पैनगंगेतून रेडझोन जिल्ह्यातील नागरिकांचा वाशिम जिल्ह्यात छुप्या मार्गाने प्रवेश, या मथळ्याखाली 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशित केली होती. जिल्हाबंदी नियमांना पायदळी तुडवल्याचे दाखविल्यानंतर येवती ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन जागे झाले आणि तत्काळ संबंधित रस्ता सील केला.

Etv Bharat  Impact washim administration notices the type of secret entry into district
'ईटीव्ही भारत' इम्पॅक्ट: वाशिममध्ये छुप्या मार्गाने प्रवेश होणाऱ्या प्रकाराची प्रशासनाकडून दखल

By

Published : May 3, 2020, 9:58 PM IST

वाशिम - जिल्हा प्रवेश बंदी असताना येवती येथे पैनगंगेतून रेडझोन जिल्ह्यातील नागरिकांचा वाशिम जिल्ह्यात छुप्या मार्गाने प्रवेश, या मथळ्याखाली 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशीत केली होती. जिल्हाबंदी नियमांना पायदळी तुडवल्याचे दाखविल्यानंतर येवती ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन जागे झाले आणि तत्काळ संबंधित रस्ता सील केला. तसेच पहाऱ्यासाठी दोन पोलीस मित्रांची नियुक्ती केली आहे.

सोबतच गावात ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करून बाहेरील व्यक्तीस गावात येण्यास मज्जाव केला आहे. रिसोड तालुक्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या येवती गावात जिल्हाबंदी नियमांना पायदळी तुडवले जात होते. हिंगोली जिल्ह्यातील काही लोक दररोज अडचणीच्या रस्त्याने वाशिम जिल्ह्यात ये जा करत होते. यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्याची भीती निर्माण झाली होती. या गंभीर प्रकाराची दखल घेत, प्रशासन जागे झाले.

ABOUT THE AUTHOR

...view details