वाशिम - जिल्ह्यात कोरोनाबाधित एकच रुग्ण असल्याने जिल्हा ऑरेंज झोनमध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे आज जिल्ह्यातील बँका, दवाखाने, मेडिकल, किराणा दुकान, भाजीपाला ही अत्यावश्यक सेवा सुरूच असून बाजार समिती, शेती उपयोगी वस्तूची दुकाने शासनाच्या नियमानुसार सुरू करण्यात आले आहेत. मात्र,यासोबत काही दुकाने मुभा नसताना उघडण्यात आले असून याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वाशिम जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा, बाजार समिती आणि शेती उपयोगी वस्तूंची दुकाने शासन नियमानुसार सुरू - Banka
कोरोना प्रादुर्भावामध्ये ऑरेंज झोनमध्ये येत असलेल्या वाशिम जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी थोडीशी मोकळीक दिल्याने परवानगी नसलेले लघुउद्योगही खुले झाले आहेत. यामुळे वाशिमच्या बाजारपेठेत परिस्थिती सामान्य असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

नियम थोडेशे शिथील केल्याने कुणीही सहज चौकात येत आहेत. चौकात आज मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. यामुळे सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनच्या सर्व नियमांना वाशिमकरांनी आज बगल दिली असल्याचे दिसून आले आहे, याचा आढावा आमचे प्रतिनिधी इम्रान खान यांनी घेतलाय.