महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कुटुंब जगवायचं कसं? वाशिम जिल्ह्यातील 30 हजार शेतकऱ्यांची कृषी पंपाची वीज तोडणी, रब्बी हंगाम धोक्यात

वाशिममध्ये ( washim ) महावितरण कंपनीकडून जिल्ह्यातील 30 हजार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ( Electricity Company Cut Electricity ) तोडण्यात आले आहे. धरणाला पाणी असूनही ते वीज अभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

वाशिम
washim

By

Published : Nov 29, 2021, 12:39 PM IST

वाशिम -वाशिमजिल्ह्यात यंदा खरीप हंगामातील सोयाबीन ( Soybean ) पीकाच्या अतिपावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळं जिल्ह्यातील शेतकऱ्यांची भिस्त रब्बीतील पिकावर होती. यासाठी कृषी विभागाने यंदा रब्बी हंगामात 1 लाख 3 हजार 600 हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले आहे. त्यापैकी जवळपास 80 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. मात्र महावितरण कंपनीकडून जिल्ह्यातील 30 हजार शेतकऱ्यांची वीज कनेक्शन ( Electricity Company Cut Electricity ) तोडण्यात आले.

वीज अभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने वाशिममधील शेतकरी हतबल झाला आहे.


आधीच शेतकरी (Farmer) मेटाकुटीस आलेला असताना महावितरण कंपनीकडून ( MSEDCL ) पुन्हा एकदा शेतीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याचे प्रकार घडत आहेत. खंडाळा शिंदे (ता.मालेगाव) येथील अनेक डिपीवरील वीज पुरवठा तब्बल 12 दिवसापासून कट करण्यात आल्याने सुमारे 100 शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. धरणाला पाणी असूनही ते वीज अभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

ऐन रब्बीत ओढवणार संकट -

महावितरणने कृषी पंपाच्या थकबाकीसाठी आक्रमक भूमिका घेत, थेट वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांपुढे संकट उभे आहे. रब्बीतील पिकांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज पुरवठाच नसेल तर या पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होणार नाही. त्यामुळे खरीपात अस्मानी संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना रब्बीत सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे.

कुटुंब जगवायचं कसं?

जिल्ह्यात अतिवृष्टी झाली, पिकाचे मोठे नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचा खरिप हंगाम पाण्यात गेला, आता रब्बी हंगामात मोठी आशा होती. पण, महावितरणच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगामंही धोक्यात जाण्याची शक्यता आहे. ऐन रब्बी हंगामाच्या तोंडावर कृषी पंपाची वीज खंडीत केल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवले आहे. अतिवृष्टीने खरिप हंगाम गेला, आता महावितरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. गहू, हरभरा कसा बसा पेरलाय, आता त्याला वाचवायचा कसा, कुटुंब जगवायचं कसं, की आत्महत्या करायची, असा संतप्त सवाल खंडाळा शिंदे येथील शेतकरी करीत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details