वाशिम - जिल्ह्यातील अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज (दि. 20) निवडणूक होऊ घातली आहे. आज सकाळी आठ वाजता जिल्ह्यात सहा ठिकाणी मतदानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी दिग्गज नेते, आजी-माजी संचालक आमने-सामने उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कोणाला हार पत्करावी लागणार, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली असून यामध्ये विविध स्वरूपातील 21 संचालक पदांसाठी होत असलेल्या या निवडणूकीत 12 जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात रिसोडमधून विद्यमान आमदार अमीत झनक, मंगरूळपीरमधून माजी आमदार सुभाषराव ठाकरे आणि वामनराव देशमुख (रिसोड) या तीघांचा समावेश आहे.