वाशिम - जिल्ह्यात मुंबईवरून पोहरादेवी येथे आलेल्या कुटुंबातील शुक्रवारी 8 वर्षीय मुलाला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्या मुलाला मंगरूळपीर विलगीकरण कक्षात उपचाराकरता दाखल केले होते. त्याचा काल(शनिवारी) रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्याला आज रुग्णालयातून टाळ्या वाजवून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वाशिममध्ये आठ वर्षीय मुलाची कोरोनावर मात, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज - वाशिम कोरोना आकडेवारी बातमी
जिल्ह्यातील पोहरादेवी येथील एका आठ वर्षीय मुलाने कोरोनावर मात केली आहे. शनिवारी प्राप्त अहवालात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज दुपारी त्याला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून सुटी देण्यात आली.
जिल्ह्यातील पोहरादेवी येथील एका आठ वर्षीय मुलाने कोरोनावर मात केली आहे. काल प्राप्त अहवालात त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आज दुपारी त्याला टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर पोहरादेवी येथील नागरिकांनी सुद्धा त्याच्या गळ्यात हार घालून फुलांचा वर्षाव करत स्वागत करण्यात आले आहे.
आज(रविवार) दुपारी २३ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून २२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एकजण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर कोरोनाबाधित रुग्ण हा आसन गल्ली, रिसोड येथील ४५ वर्षीय पुरुष असून त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींच्या माहिती संकलनासह इतर आवश्यक कार्यवाही प्रशासनाने सुरू केली आहे. दरम्यान, वाशीम जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 70 वर पोहोचली आहे. तर, अकरा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, सध्या 57 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.