वाशिम -वाशिम जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यात झालेल्या अती पावसामुळे माहुली ते चाकूर या दोन गावांना जोडणारा रस्ता वाहून गेला असून, रस्त्यावर चिखल झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्याअभावी सोयाबीन शेतातच पडून, रस्ता तयार करण्यासाठी तहसीलदारांना निवेदन - वाशिम तहसील कार्यालय
वाशिम जिल्ह्यात यंदा अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. मानोरा तालुक्यात झालेल्या अती पावसामुळे माहुली ते चाकूर या दोन गावांना जोडणारा रस्ता वाहून गेला असून, रस्त्यावर चिखल झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे हाल
आठ वर्षांपूर्वीच या रस्त्याला मंजुरी मिळाली होती. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हा रस्ता अद्याप पूर्ण झालेला नाही. सध्या सोयाबीन काढणीचा हंगाम सुरू असून, रस्त्याअभावी सोयाबीन शेतातच पडून आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.