महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाशिममध्ये वाहून गेलेल्या भावाचा मृतदेह सापडला..बहिण अद्यापही बेपत्ता - Washim

वाशिम जिल्ह्यात नाल्यामधून चार मुले वाहून गेली होती. त्यातील दोघांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले होते. पैकी यात वाहून गेलेल्या बहिण भावांपैकी भावाचा मृतदेह सापडला असून बहिण अद्यापही बेपत्ता आहे. शोधकार्य सुरू आहे.

भाऊचा मृतदेह सापडला..बहिण अद्यापही बेपत्ता

By

Published : Jul 3, 2019, 11:35 PM IST


वाशिम - जिल्ह्यातील शिरपूर-आसेगाव रोडवरील वाघीच्या समोरील नाल्यामध्ये मंगळवारी दोन जुलैला 4 मुले पाण्यामध्ये वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामधील गावकऱ्यांनी 2 मुलांना वाचविण्यात यश आले. तर दोघे बहीण भाऊ बेपत्ता होते. त्यामधील पारस बाळू पवार (वय 8 वर्ष ) याचा आज मृतदेह आडोळ प्रकल्पात तरंगताना सापडला.

भावाचा मृतदेह सापडला..बहिण अद्यापही बेपत्ता

वाघी बुद्रुक येथे चार मुले नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेली. त्यामध्ये ओमकार राधेश्याम पवार व शुभम अनिल पवार या दोघांना गावकऱ्यांना वाचविण्यात यश आले. तर पूजा बाळू पवार वय 14 वर्ष, तर तिचा भाऊ पारस बाळू पवार वय 8 वर्ष यांना शोधण्यासाठी आज पहाटेपासून संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे शोधकार्य सुरू होते. मात्र सहा वाजेपर्यंत या पथकाने त्या दोन्ही भाऊ बहिणीला शोधण्यास अपयश आले.

थोड्याच वेळात गावकऱ्यांनी आडोळ प्रकल्पात एक मृतदेह तरंगताना दिसला व याची माहिती शोध कार्य करणाऱ्या पथकाला देण्यात आली व मृतदेह बाहेर काढण्यात आले. हा मृतदेह पारस पवार वय आठ वर्ष याचा असून याची बहीण पूजा अद्यापही बेपत्ता आहे. शोध कार्य थांबले असून उद्या पहाटे पुन्हा सुरू होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details