महाराष्ट्र

maharashtra

बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराजांचे निधन; सोमवारी 'इथे' होणार अंत्यसंस्कार

बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने काही महिन्यांपूर्वीपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी दुपारी चार वाजता पोहरदेवी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

By

Published : Oct 31, 2020, 11:22 AM IST

Published : Oct 31, 2020, 11:22 AM IST

Updated : Oct 31, 2020, 2:28 PM IST

धर्मगुरू डॉ. रामराव महाराज
धर्मगुरू डॉ. रामराव महाराज

वाशिम- संत सेवालाल महाराजांचे वंशज आणि बंजारा समाजाचे धर्मगुरू डाॅ. रामराव महाराज यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 85 वर्षाचे होते. श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने मागील काही महिन्यांपासून लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रामराव महाराज यांच्या पार्थिवावर वाशिम जिल्ह्यातील पोहरदेवी येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. अंतिम दर्शनासाठी भक्तांची त्यांचे पार्थिव येण्याच्या मार्गावर ठिक-ठिकाणी गर्दी होत आहे.

हरिभाऊ राठोड यांनी भावना व्यक्त केल्या

वयाच्या 14 व्या वर्षी मिळाला गादीचा मान...

बंजारा समाजाचे धर्मगुरू रामरावबापू महाराज यांचा जन्म 7 जुलै 1935 ला पोहरादेवी येथे झाला. 1948 मध्ये पोहरादेवी येथील परशराम महाराज शिवलिन झाल्यावर वयाच्या 14 व्या वर्षी ते गादीवर बसले. परिसरातील 52 गावच्या नाईक यांनी रामरावबापू महाराजांना उत्तराधिकारी म्हणून गादीवर बसविले. 12 वर्षे अनुष्ठान व 12 वर्षे मौन धारण केल्यानंतर बापू यांनी देश भ्रमणास सुरूवात केली होती.

डाॅ. रामराव महाराजांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेतली

सोमवारी होणार अंत्यसंस्कार...

रामरावबापू महाराजांची प्रकृती वर्षभरापासून अस्थिर होती. तसेच श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर काल (शुक्रवारी) कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री 11 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. पुणे, औरंगाबाद, जालना आणि वाशिम जिलह्यांत मोठ्या प्रमाणात बंजारा समाज आहेत. तसेच इतर ठिकाणी देखील त्यांचे भक्त आहेत. याठिकाणचे भक्त बापूंचे अंतिम दर्शन घेणार आहे. त्यानंतर दुपारी 4 वाजताच्या सुमारास पार्थिव पोहरदेवी येथे पोहचणार आहे. रामराव महाराजांच्या पार्थिवावर सोमवारी पोहरादेवी येथे अंत्यसंस्कर करण्यात येणार असल्याची माहिती महंत बाबूसिंग महाराज, संजय महाराज वंशज यांनी दिली.

पंतप्रधान मोदींसोबत महाराज
Last Updated : Oct 31, 2020, 2:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details