महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद; मध्यस्थी करणाऱ्या पोलिसांवरही हल्ला - Jaulka Railway police

वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला.

Jaulka Railway
जऊळका रेल्वे येथे दोन गटात वाद

By

Published : May 26, 2021, 5:03 PM IST

Updated : May 26, 2021, 5:45 PM IST

वाशिम - वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे येथे दोन गटात शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून वाद झाला. हा वाद सोडविण्यासाठी जऊळका पोलीस गेले असता, तेथील जमावाने पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत. दरम्यान, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने वाशिम पोलिसांनी गावात अतिरिक्त पोलिसांची कुमक बोलावली असून,चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

माहिती देताना जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी

मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथे शेतातील माती चोरल्याच्या कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला. हा वाद सोडविण्यासाठी पोलीस गेले असता त्यांनी उलट पोलिसांवर हल्ला केला. दरम्यान, आम्ही अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या गावातील दोन्ही गटातील आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू असून, गावात सध्या शांतता असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी सांगितले आहे.

हेही वाचा -..त्यामुळे राज्यात लॉकडाऊन पुन्हा वाढणार? मंत्री अस्लम शेख यांचे संकेत

Last Updated : May 26, 2021, 5:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details