वाशिम- उत्तरप्रदेश येथील ट्रक चालक वाशिम जिल्ह्यातून जात असताना त्यांची अचानक प्रकृती बिघडली होती. यानंतर त्याला कुकसा फाटा येथे चेकपोस्ट वरून 3 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता. उपचारादरम्यान चालकाच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविले होते. ते पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ - कुकसा फाटा
मृत ट्रक चालकाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने ट्रकमध्ये डिझेल भरलेला अक्षय पेट्रोलपंप खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे.
उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या ट्रक चालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात खळबळ
ट्रक चालकाने प्रवास करताना अक्षय पेट्रोलपंपावर ट्रकमध्ये डिझेल भरले होते. प्रशासनाने खबरदारीचा उपाय पेट्रोलपंप सील केला आहे. पेट्रोल पंपावरिल दोन कर्मचारी आणि मृताचा सहकारी चालक यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. सद्यस्थितीत तरी जिल्हा कोरोना मुक्तच आहे.