वाशिम- आम्ही राज्यात मोठ्या प्रमाणात विहिरी केल्या, शेततळे केले असे मुख्यमंत्री 'महाजनादेश' यात्रेत सांगतात. मात्र, प्रत्यक्षात विहिरी आणि शेततळे गायब झाल्याचे चित्र आहे. या सरकारने खोदलेल्या विहिरी जन सामान्यांना दिसत नाही. ते फक्त पुण्यवान भाजप कार्यकर्त्यांनाच दिसते, असा टोला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर लावला आहे.
शिवसेनेने 'जन आशीर्वाद' यात्रा काढली आहे. त्यात ते युवासेना प्रमुखांना मुख्यमंत्री करणार असे म्हणतात. मात्र, आदित्य ठाकरे पेंग्विनसाठी रडतात त्यामुळे त्यांना पेंग्विन म्हटले पाहिजे अशी टीका, धनंजय मुंडे यानी 'शिवस्वराज' यात्रे निमित्त कारंजा येथे आले असता जाहीर सभेत केली.