महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गारपिटीचा शेकडो एकर संत्रा बागेला फटका, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान - गारपिटीने शेकडो एकर संत्रा बागेचे मोठे नुकसान

वाशिम जिल्ह्यात गारपिटीने शेकडो एकर संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. अवकाळी पावसासोबत गारांचा वर्षाव झाल्याने संत्र्याचा मृग बहार पूर्णपणे नष्ट झाला आहे.

Destroyed orange crop for heavy rain in washim
गारपिटीचा शेकडो एकर संत्रा बागेला फटका

By

Published : Mar 19, 2020, 2:44 PM IST

वाशिम - जिल्ह्यात काल (बुधवार) रात्री अवकाळी पावसासोबतच झालेल्या गारपिटीने शेकडो एकर संत्रा बागेचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधीकच भर पडली आहे. अवकाळी पावसासोबत गारांचा वर्षाव झाल्याने संत्र्याचा मृग बहार पूर्णपणे नष्ट झाला आहे. या अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

गारपिटीचा शेकडो एकर संत्रा बागेला फटका

अवकाळी पावसासोबत झालेल्या गारपिटीने कांदा, ज्वारी, मका, गहू, हरभरा, आंब्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा पंचनामा करून सरकारने भरीव मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा परिसरात झालेल्या गारपिटीमुळे गजानन पाकढने यांच्या २ एकरातील तोडणीला आलेल्या संत्रा फळबागेचे 80 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून आमची आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेऊन हा संत्रा बहार घेतला, तो या अवकाळी पावसामुळे पूर्णपणे नष्ट झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तसेच रब्बीतील पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details