आरटीपीसीआर नमुने तत्काळ पाठविण्यास सुरुवात - वाशिम कोरोना अपडेट
नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच आरोग्य विभागाला जाग आली आहे. यानंतर घेतलेले आरटीपीसीआर चाचणीचे नमुने तपासणीसाठी लॅबवर तत्काळ पाठविण्यात सुरुवात झाली आहे.
वाशिम
वाशिम- मालेगाव तालुक्यातील जऊळका आणि शिरपूर जैन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 'आरटीपीसीआर'च्या चाचणीसाठी घेण्यात आलेले घशातील स्त्रावाचे नमुने जास्त दिवस पडून आहेत. त्या नमुन्यांमध्ये बुरशी तयार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच आरोग्य विभागाला जाग आली आहे. यानंतर घेतलेले आरटीपीसीआर चाचणीचे नमुने तपासणीसाठी लॅबवर तत्काळ पाठविण्यात सुरुवात झाली आहे.