महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरातील ‘ऑक्सिजन प्रकल्पाचे’ लोकार्पण - ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यन्वित

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात केंद्र शासनामार्फत प्राप्त निधीतून दर मिनिटाला हवेतून २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.

ऑक्सिजन प्रकल्पाचे’चे लोकार्पण
ऑक्सिजन प्रकल्पाचे’चे लोकार्पण

By

Published : May 2, 2021, 7:20 AM IST

वाशीम - जिल्हा स्त्री रुग्णालय येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते १ मे रोजी करण्यात आले. तसेच या ठिकाणी आणखी दोन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार असून या प्रकल्पांच्या कामाचे भूमिपूजनही पालकमंत्री देसाई यांनी केले.

यावेळी आमदार अमित झनक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा कोविड रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. राजेश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मिनिटाला हवेतून २०० लिटर ऑक्सिजन

जिल्हा स्त्री रुग्णालय परिसरात केंद्र शासनामार्फत प्राप्त निधीतून दर मिनिटाला हवेतून २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून याठिकाणी आणखी २ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. तसेच कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे एक प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

या प्रकल्पामधून मिनिटाला प्रत्येकी ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती होणार आहे. या कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. स्त्री रुग्णालय परिसरातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची उभारणीचे १५ मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री देसाई यांनी यावेळी संबंधितांना दिल्या आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details