वाशिम -कोरोना या महाभयंकर व्हायरसच्या महायुद्धात पूर्ण देशातील व्यवहार ठप्प पडली आहे. महानगरातील सर्वच व्यवसाय बंद पडल्याचा परिणाम इतर जिल्ह्यातील परंतू वास्तव्यास पुणे येथे असणाऱ्या छोट्या व्यवसायिकाला जाणवू लागला आहे.
पुण्यात कोरोनाने व्यवसाय ठप्प, गावात येऊन शेती करण्याचा निर्णय - पुण्यातील व्यवसाय ठप्प पडल्याने गावी शेती करण्याचा निर्णय
गोपाल राऊत आणि त्यांची पत्नी स्वाती राऊत हिने पुढाकार घेऊन वडिलोपार्जित जमीन करण्याचा निर्णय घेतला. मागील ६० दिवसापासून आपल्या शेतात नागरणी, वखरणी, डवरणी, विहिर खोलीकरण, पाईपलाईन करणे, थिंबक सिंचनाचे जाळे पसरवणे, काडी कचरा वेचणे पावसाळा तोंडावर आलेला असताना पेरणीकरता व फळबागांची लागवड करण्याकरता राब-राब राबून आपली शेती तयार करण्यास मदत करत आहेत.

पुण्यात कोरोनाने व्यवसाय ठप्प, गावात येऊन शेती करण्याचा निर्णय
वाशिम जिल्ह्यातील वनोजा येथील राऊत परिवार उद्योगाकरता पुणे येथे वास्तव्याला होते. पुण्यात त्यांची फायर सिस्टम कंपनी होती. याच्या माध्यमातून ते नवीन बिल्डिंगमध्ये आगीपासून संरक्षण होणारे उपकरण लावण्याचा व्यवयसाय करत. या कंपनीची वर्षाची एक कोटींच्या जवळपास उलाढाल होती. त्यांना वर्षाचे पन्नास लाख रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र, टाळेबंदीमध्ये त्यांचा व्यवसाय बंद झाला आणि राऊत परिवाराने मूळ गावाकडे धाव घेतली. गावात आल्यावर शेती करण्याचा निर्णय घेतलाय.
पुण्यात कोरोनाने व्यवसाय ठप्प, गावात येऊन शेती करण्याचा निर्णय