महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह, गावात खळबळ - dead body in wasim

मालेगाव तालुक्यातील धमधमी शेत शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मोरे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

By

Published : Mar 6, 2021, 3:31 PM IST

Updated : Mar 6, 2021, 3:37 PM IST

वाशिम -मालेगाव तालुक्यातील धमधमी शेत शिवारात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती जऊळका पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय मोरे यांना मिळतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत 18 ते 23 वयोगटातील असून अंगावर फक्त चेक्स असलेला रुमाल व हातामध्ये काळा व हिरवा धागा बांधलेला असून अज्ञात व्यक्ती बाहेरच्या राज्यातील असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या भागात समृध्दी रोडचे व रेल्वेची कामे मोठ्या प्रमाणात चालू असून मृत व्यक्ती कामासाठी आला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

धमधमी शेतशिवारात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह
घटनास्थळी श्वानपथक व ठसा तज्ज्ञ कसून तपास करीत असून जऊळका रेल्वेचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्यासह त्यांचे सहकारी घटनास्थळी पंचनामा करीत असून पोलिसांसमोर अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान आहे.
Last Updated : Mar 6, 2021, 3:37 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details